मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातर्फे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. शिवानंद आडकिणे साहेबांच्या हस्ते धान्य, कपडे आणि संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. इंग्रजी विषयच्या प्राध्यापिका सौ. एन. टी. चवळे यांनी देखील भरीव अशी मदत विद्यार्थ्यांना केली. प्रस्तुत महाविद्यालयातर्फे नेहमीच अश्या प्रकारची सामाजिक जाणीव ठेवून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.